History of Vangaon Education Society

स्वातंत्र्यपूर्व काळात वाणगांवची व्याप्ती फारच लहान होती. गावाच्या उत्तरेस खाडी आणि खाजण, दक्षिणेस गवताळ जमीन, पुवैस आदिवासी व वनक्षेत्र खाडी व अविकासित भाग असे हे वाणगांव एखाद्या बेटाप्रमाणे बसलेले होते. गावाच्या प्रमुख वस्तीपासून थेडया थोडया अंतरावर पाटीपाडा, कोंबपाडा, पाटेपाडा, बाकीपाडा, केतखाडीपाडा, स्टेशनपाडा अशा लहान-लहान आदिवासी पाडयांनी (वाडया) वेढलेले होत. त्यावेळीच्या खानेसुमारीप्रमाणे साधारण सातशे-आठशे लोकवस्ती असावी. वाणगांव गावाला तसा इतिहास नाही. जे आजचे पगत रूप दिसत आहे ते गेल्या काही वार्षातील आहे. या भागातील मुळवस्ती ही सत्तर टक्के आदिवासीची व बाकीची मध्यम वर्गीयांची. रेल्वे येण्यापूर्वी हा भाग तसा दुर्लक्षितच होता. परंतु शंभर सव्वाशे वर्षापूर्वी रेल्वे आल्यामुळे बाहेरुन काही उत्तर प्रदेशीय त्याचप्रमाणे गुुजराथी, जैनसमाज मंडळी येथे कामाधंद्यानिमित्त येऊन स्थायिक झाली. त्यावेळेला चिंचणी ही बाजारपेठ असल्यामुळे त्यापैकी व्यापारी मंडळी चिंचणी येथे स्थायिक राहून व्यापारधंद्यापुरतीच वाणगांव येथे ये-जा करीत होती. त्यांच्या बÚयाचश्या मालकीच्या जमिनी या भागातच होत्या. मलेरिया व इतर साथी नेहमी पडत असल्यामुळे ही मंडळी चिंचणी येथे राहत होती. त्यामुळे वाणगांव हे वनगांव समजले जात होते. त्यावेळी वाणगंाव येथे जैन समाजाची किराणा मालाची सात-आठ दुकाने व एकदोन लहानशी हाॅटेल्स एवढीच मर्यादित बाजारपेठ होती. या ठिकाणी प्रामुख्याने शेती व गवताचा धंदा होता. परंतु उत्तर प्रदेशीय मंडळी येथे आल्यानंतर गवताच्या धंद्यास महत्त्व प्राप्त झाले. अशा या गावामध्ये वाणगाव-चिंचणी हा वाहतुकिसाठी कच्चा रस्ता होता. त्यावरून टांगे व खाजगी प्रवासी वाहने धावत होती. दिवसातून मोजक्याच रेल्वेच्या एक-दोन पॅसेंजर गाडया ये-जा करीत होत्या. संध्याकाळी सात वाजेनंतर सर्वत्र सामसून असायची. अशावेळी एकटया-दुकटया माणसाला बाहेर फिरणे कठीण जात होते. एकंदरीत लोकांचे जीवन अंधारमय, दिशाहीन, भरकटलेले असे होते. अशावेळी नियतीने लोकांना नवा प्रकाश, नवी दिशा दाखविण्यासाठी, वाणगावचा कायापालट करण्यासाठी, भीतीचे वातावरण नाहीसे करण्यासाठी श्री. वैजनाथ शेठ कुटुंबियांची नियुक्ती केली असावी असे समजण्यास काही हरकत नाही.

श्री. ठाकूर कुटुंब हे उत्तर प्रदेशातील रायबरेली या गावातून नोकरी धंद्यानिमित्त वाणगांव येथे आले व स्थायिक झाले. थोडयाच अवधीत स्वकष्टाने व शोधक दृष्टीने गवत धंद्याचे सारे ज्ञान आत्मासात केले व गवत धंद्यात चांगलाच जम बसविला. सदरहू धंदा करीत असताना त्यांना अनेक अडचणी व आपत्तींना तांेड द्यावे लागले. त्यावर मात करून त्यानी स्थावर मिळकत घेउन सन 1942 साली एक लहानसा कौलाक बंगला बांधला आणि ते झोपडीत बंगल्यात राहण्यास आले. त्यावेळेपासूनच वाणगावच्या विकासाला चालना मिळाली. स्वतःचा विकास होत असताना वाणगावचाही विकास व्हावा ही दूरदृष्टी ठेवली व वाणगांवच्या एका नव्या ’दानशूर बैजनाथ शेठ’ युगास प्रारंभ झाला .....